Thursday, May 28, 2020

वात्रटिका

राजकारणी कधी कळतात
पदावर विराजमान असताना
आणि
पदावरून पायउतार असताना ं

Saturday, August 10, 2019

काश्मिर आज आणि उद्या

काश्मीर आज आणि उद्या
      भारत सरकारने काल ३७० कलम काढून टाकले आणि देशभरात आनंद उत्सव सुरू झाला.जम्मू आणि काश्मीर हा  पाकीस्तानच्या राजकीय स्थैर्याचा विषय आहे.ज्या पाकिस्तानी नेत्यांनी हा विषय आळवला त्यांनाच राजकीय स्थैर्याचा फायदा झाला.अन्यथा तेथील मिल्ट्रीने त्यांना सत्तेवरून पायउतार केले.ही वास्तविकता आहे, ही आपणास भविष्यात विसरुन चालणार नाही.कारण भारत विरोधी भूमिका घेतली तरच पाकिस्तानी नेत्यांना लोकप्रियता मिळते.थोड्याफार फरकाने भारतातही अशीच परिस्थिती आहे.भारताने आतापर्यंत हजारो कोटी रुपये जम्मू व काश्मीर मध्ये घातले पण लोकमान्यता भारतीय सरकारला मिळू शकली नाही याचे मुख्य कारण तेथील राजकीय सामाजिक व आर्थिक परिस्थिती हे आहे.
      बहुसंख्यक समाज मुस्लिम असल्याचा फायदा पाकिस्तानणे घेतला व तेथील लोकांना जिहादच्या मार्ग दाखवला.भारत विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील लोकांना भडकावले शस्त्रे व पैसा पुरवठा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ केला आणि लोकांना व तरूण रक्ताच्या  तरुणांना शिक्षण व विकास यापासून  दूर नेले. याचे पर्यावसन राजकीय अस्थिरतेत झाले व शांततेला बाधा निर्माण झाली आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काश्मिरी तरुण मागे आहेत याचे मुख्य कारण 370 वे कलम हे आहे. आज भारतीय सरकारने हे कलम काढून पाकिस्तानी नेत्यांना चपराक मारली आहे काश्मीरच्या विकासातील मुख्य अडसर 370 वे कलम आहे ‌‌‌‌हे काढल्यामुळे भारत सरकारच्या सर्व योजनांचा लाभ काश्मीरी लोकांना होईल व ते नकळतपणे मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येतील यात कसलीही शंका घेण्याचे कारण नाही.
     भारतीय लोकशाहीत विरोधक हे मुख्य अंग आहेत, याशिवाय लोकशाही व्यवस्थित चालू शकत नाही.सत्ताधारी व विरोधक एक झाले तर देशाचा बैयणामा दुसऱ्याला करून द्यायला वेळ लागणार नाही. म्हणून यावर लक्ष ठेवणे हे सुजाण भारतीय मतदारांचे काम आहे ‌‌‌‌.
     बहुसंख्याक समाज एक झाला तर अल्पसंख्याक समाजावर अन्याय करतो हे कडू जरी असले तरी सत्य आहे याचे ज्वलंत उदाहरण जम्मू-काश्मीर हे आहे.म्हणून खेडे गावात असो कि देशात असो बहुसंख्य समाजात वैचारिक व राजकीय मतभिन्नता असणारे गटतट असणे आवश्यक आहे त्यामुळे छोट्या जातीवर किंवा समाजावर अन्याय होत असेल तर एक गट त्यांची बाजू घेईल व ते सुरक्षित राहतील अन्यथा ते एक झाले तर सर्व मिळून छोट्या समाजावर किंवा जातीवर अन्याय करतील म्हणून त्यांच्यात वैचारिक राजकीय फूट असणं निकोप लोकशाही वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक आहे ‌‌व तशी काळजी घेणे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे.काश्मीर मध्ये गावपातळीवर राजकीय गटतट नव्हते कारण ग्रामपंचायत अस्तीत्वात नव्हत्या त्यामुळे राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.व येथेच चुकले बळकट लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.सत्ता एकहाती एकवटली की तिचे दुष्परिणाम होतातच हेच काश्मिरमध्ये झाले.स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने व भारतीय आरक्षण लागू नसल्याने सत्तेत सहभागी होण्याची संधी तेथील दुसऱ्या छोट्या छोट्या समाजाला मिळाली नाही.त्यामुळे इतर समाजाचा आवाज आपोआपच दबला गेला.हे चाणाक्ष नेतृत्वाने ओळखून ग्रामपंचायतचे मतदान घेतले व स्थानिक लोकांना गावगाडा हाकण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली याचा परिणाम आपोआपच ही माणसे मुख्य प्रवाहात येतील यात शंका घेण्याचे कारण नाही.हे होवू घातले आहे.
   आज कांहीं लोकांना काश्मिरी जनता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.पण सतत अस्थिरतेचे ढग खूनखराबा बेकारी दररोज जगण्यासाठी करावी लागत असलेली कसरत यामुळे येथील जनता कंटाळली आहे.370 कलम हाटवल्यामुळे अंधकारमय भविष्यात आशेचा किरण काश्मीरी जनतेस दिसत आहे. आज जग व यात आपले स्थान काय आहे याची जाणीव काश्मिरी जन तेस झाली आहे.अंधकारमय भविष्याचा त्यांना कंटाळा आला आहे ‌. दैनंदिन प्रपंचात माणूस अडकला की त्याला कुटुंबाच्या प्रापंचिक अडचणी शिवाय दुसरे कांहीही दिसत नाही व सुचत नाही आणि सुचलं तरी त्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या विचार करु देत नाहीत हे सत्य आहे.
    भविष्यात रोजगाराच्या संधी, पर्यटन व्यवसायात होणारी वाढ यामुळे विविध विचारांची आचारांची संस्कृतीची माणसे येथे येऊन कांहीं दिवस काश्मीर मध्ये राहून जातील त्यांच्या संपर्कामुळे आपोआपच परिवर्तनाची लाट निर्माण होईल.हातात काम असलेल डोकं हाताकडे लक्ष देत. दुसऱ्या गोष्टींचा विचार करू देत नाही.हातात काम नसेल तर त्याला रिकामा विचार करायला वेळ मिळतो.रिकामे डोकं सैतानाचे घरं असते पण आता काश्मिरी जनतेच डोकं रिकामे राहणार नाही कारण त्यांच्या हातात काम असेल आपल्या संपत्तीची व संपत्तीची चिंता असेल त्यामुळे पाकिस्तानचे ऐकत बसायला काश्मिरी तरुणांकडे वेळ नसेल व तशी परिस्थिती भारत सरकार मिळू देणार नाही अशी चिन्हे सध्याच्या सरकारची दिसत आहेत.पण भविष्यात तशी पावले उचलली पाहिजेत अन्यथा ही एक राजकिय चूक असा इतिहास निर्माण होईल. आजच्या भारतीय राजकारणातील घडामोडींचा व भारतीय लोकांच्या मानसिकतेत खूप मोठा बदल होत असल्याचं दिसून येतं आहे.भारत फक्त देवच न राहता भारत हा एक विचार म्हणून जगाच्या पुढे येत आहे.व या विचाराला जग स्विकारत आहे हे सध्याच्या जागतिक स्तरावर भारताच्या स्थानावरुन दिसून येत आहे.ही एक मोठी उपलब्धी आहे.काश्मिर प्रश्न सोडवून भारताने जगाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे.जग विस्तारलेल्या डोळ्यांनी आमच्या प्रत्येक कृतीकडे व पावलाडे पहात आहे ‌.
                              विवेक होळसंबरे
                                    उपाध्यक्ष .
                मराठवाडा साहित्य परिषद उदगीर